मिनी लॉकडाऊनचा परिणाम : साईनगरीत भाविकांची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:41 PM2021-02-26T16:41:38+5:302021-02-26T16:42:29+5:30
कोरोनाने कहर पुन्हा सुरू झाल्याने लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडॉऊनमुळे शिर्डीत भाविकांची संख्या रोडावली आहे. यामुळे शिर्डीकर पुन्हा हवालदिल झाले आहेत.
शिर्डी : कोरोनाने कहर पुन्हा सुरू झाल्याने लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडॉऊनमुळे शिर्डीत भाविकांची संख्या रोडावली आहे. यामुळे शिर्डीकर पुन्हा हवालदिल झाले आहेत.
१६ नोव्हेंबरला साईमंदिर सुरू झाले असले तरी भाविकांच्या संख्येवर नियंत्रण व दहा वर्षाखालील व ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे नेहमीच्या तुलनेत शिर्डीत भाविकांची संख्या कमी असली तरी थोड्याफार प्रमाणात व्यवहार सुरू झाले होते. बाजारपेठेत पुन्हा हालचाल जाणवू लागली होती.
दरम्यान साईनगरीतील व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता रात्री नागरिकांच्या फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे भाविकांचा ओघ एकदम कमी झाला आहे.