गावागावांत कोविड सेंटर झाल्यास सामान्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:22 AM2021-05-06T04:22:19+5:302021-05-06T04:22:19+5:30
निघोज : गावागावांत कोविड सेंटर झाल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. निघोज (ता. पारनेर) ...
निघोज : गावागावांत कोविड सेंटर झाल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
निघोज (ता. पारनेर) येथील रांजणखळगे परिसरातील संदीप पाटील वराळ फाउंडेशनच्या वतीने १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे लंके यांनी भेट देऊन पाहणी केली.
येथील कोविड सेंटर १०० बेडचे असून ५० बेड ऑक्सिजन सुविधेचे आहेत. यामुळे परिसरातील कोरोना रुण्गांना मोठा आधार मिळणार असल्याची माहिती सरपंच चित्रा वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ यांनी दिली.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, निघोज प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. रोहिणी डोणे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेश सरडे, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ वरखडे, मुंबई बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुनील पवार, उद्योजक पप्पू जासूद, बाबाजी लंके, दत्ताजी उनवणे, बजरंग वराळ, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, जया वराळ, रावसाहेब वराळ, अस्लम शेख, भीमा लामखडे, उत्तम लामखडे, अप्पा वराळ, विलास हारदे, बाळासाहेब लंके, मंगेश लंके आदी उपस्थित होते.