शेतक-यांना दिलासा..कोपरगाव तालुक्यात १९४ मेट्रिक टन युरिया दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 03:57 PM2020-06-14T15:57:30+5:302020-06-14T15:58:47+5:30
कोपरगाव तालुक्यात रविवारी सकाळी १९४ मेट्रिक टन युरिया दाखल झाला आहे. आठवडाभरात आणखी ९०० मेट्रिक टन युरिया येणार असल्याची माहिती कोपरगावच्या कृषी विभागाने दिली आहे.
कोपरगाव : तालुक्यात रविवारी सकाळी १९४ मेट्रिक टन युरिया दाखल झाला आहे. आठवडाभरात आणखी ९०० मेट्रिक टन युरिया येणार असल्याची माहिती कोपरगावच्या कृषी विभागाने दिली आहे.
शेतक-यांना युरिया मिळत नसल्याने लोकमतने या संदर्भात शुक्रवारच्या ( दि.१२) अंकात वस्तूनिष्ठ बातमी प्रसिद्ध करून वाचा फोडली होती. शासनाने त्याची दखल घेऊन दोनच दिवसात युरियाचा पुरवठा केला आहे. त्यामुळे शेतक-याना दिलासा मिळाला आहे.
यंदाचा खरीप हंगाम सुरु झाला. शेतकरी बांधवानी आपल्या शेतजमिनीची मशागत करून पेरणीची तयारी केली होती. त्यासाठी चांगल्या पावसाची वाट बघत होते.
पेरणीसाठी लागणारी खते, बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करीत होते. शेतकºयांना बियाणे मिळत होते. मात्र युरिया मिळत नव्हता. यामुळे शेतक-यांची निराशा होत होती.