दहिगावबोलका ग्रामस्थांना दिलासा : ‘त्या’ महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 01:33 PM2020-05-22T13:33:45+5:302020-05-22T13:34:56+5:30

दहिगाव बोलका येथील शिवाजीनगर परिसरातील साठ वर्षीय महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दहिगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Consolation to the villagers of Dahigaonbolka: 'That' woman's report is negative | दहिगावबोलका ग्रामस्थांना दिलासा : ‘त्या’ महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह

दहिगावबोलका ग्रामस्थांना दिलासा : ‘त्या’ महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह

दहिगाव बोलका : येथील शिवाजीनगर परिसरातील साठ वर्षीय महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दहिगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दि.१७ मे रोजी सदर महिलेला उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. प्रथम ‘त्या’ महिलेस कोपरगाव येथे तेथून नगर येथे हलविण्यात आले होते. महिलेच्या घशातील स्त्रावाचा रिपोर्ट गुरुवारी (दि.२१) रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यानंतर संबंधित रूग्णास कोपरगाव येथे परत पाठविण्यात आले. दि.२२ मे रोजी तीला गावी परत पाठविण्यात येणार असून पुढील दहा दिवस त्या महिलेला जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
संबंधित महिलेला व तिच्याबरोबर असलेल्या व्यक्तीस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्या बाबतची कल्पना ग्रामपंचायत दहिगाव बोलका यांना देण्यात आली आहे, असे दहिगाव बोलका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रज्ञा भगत यांनी सांगितले.

Web Title: Consolation to the villagers of Dahigaonbolka: 'That' woman's report is negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.