विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघात वाळूउपसा रोखण्यासाठी लोकच उतरली नदीपात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:35 PM2018-06-04T14:35:03+5:302018-06-04T14:35:41+5:30
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर हनुमंतगाव येथे नदीपात्रात ेबेसुमार वाळूउपसा सुरू असतानाही जिल्हा प्रशासन काहीही कारवाई करण्यास धजावत नाही. याबाबत विखे यांनीही मौन बाळगले आहे. त्यामुळे अखेर सोमवारी गावकऱ्यांनीच नदीपात्रात उतरून वाळूउपसा रोखण्याची भूमिका घेतली आहे. परंतु पोलिसांनी चक्क या ग्रामस्थांनाच अडवत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे नदीपात्रात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
अहमदनगर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर हनुमंतगाव येथे नदीपात्रात ेबेसुमार वाळूउपसा सुरू असतानाही जिल्हा प्रशासन काहीही कारवाई करण्यास धजावत नाही. याबाबत विखे यांनीही मौन बाळगले आहे. त्यामुळे अखेर सोमवारी गावकऱ्यांनीच नदीपात्रात उतरून वाळूउपसा रोखण्याची भूमिका घेतली आहे. परंतु पोलिसांनी चक्क या ग्रामस्थांनाच अडवत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे नदीपात्रात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हनुमंतगाव येथे वाळूउपशाचे नियम ढाब्यावर बसवून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने गेल्या तीन दिवसांपासून यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून प्रकाश टाकला. परंतु तरीही या उपशाबाबत जिल्हा प्रशासनाने पाहणी केली नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे किंवा पालकमंत्री राम शिंदे यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. सोमवारी हा वाळूउपसा रोखण्याबाबत ग्रामस्थांनी महसूल अधिकारी व पोलिसांना कळवले. मात्र महसूलने याची कोणतीही दखल घेतली नाही. पोलीस आले तर त्यांनी लोकांवरच दादागिरी सुरू केली. ‘तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करू’, अशी धमकी पोलिसांनी ग्रामस्थांना दिली. त्यामुळे येथे उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता.