कोपरगावात शंभर बेडच्या कोविड केअर सेंटरची निर्मिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 06:26 PM2020-04-20T18:26:54+5:302020-04-20T18:27:07+5:30

कोपरगाव : कोरोना संबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाच्यावतीने कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात शंभर बेडच्या कोविड केअर सेंटर सज्ज करण्यात आले. मात्र वरिष्ठ स्तरावरून परवानगी मिळताच हे सेंटर लवकरच सुरू ...

Construction of 100 Beds Covid Care Center in Kopargaon | कोपरगावात शंभर बेडच्या कोविड केअर सेंटरची निर्मिती 

कोपरगावात शंभर बेडच्या कोविड केअर सेंटरची निर्मिती 

कोपरगाव : कोरोना संबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाच्यावतीने कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात शंभर बेडच्या कोविड केअर सेंटर सज्ज करण्यात आले. मात्र वरिष्ठ स्तरावरून परवानगी मिळताच हे सेंटर लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील साठ वर्षीय महिलेचे कोरोनामुळे तर शिंगणापूर येथील एका महिलेचे सारी सदृष्य आजाराने निधन झाले. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यासाठी ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, दमा व श्वास घेण्यास त्रास होत असेल अशा रुग्णांना भरती करून उपचार करण्यासाठी एस.एस.जी.एम.कॉलेज येथील मुलींचे वसतिगृहात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये खाजगी व सरकारी डॉक्टर या रुग्णांवर उपचार करणार आहे असेही आमदार काळे यांनी शेवटी म्हंटले आहे.

     ……………………..

फोटो -कोपरगाव येथील एस. एस. जी. एम. कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात शंभर बेडचे कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.

Web Title: Construction of 100 Beds Covid Care Center in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.