कोपरगावात बांधकाम विभागाचा अतिक्रमणावर हातोडा; कडक पोलीस बंदोबस्तात स्टेशनरोड परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात
By रोहित टेके | Updated: May 17, 2023 13:30 IST2023-05-17T13:30:02+5:302023-05-17T13:30:27+5:30
यापूर्वी १०० ते १२५ अतिक्रमण धारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात दोनवेळा नोटीस बजावल्या होत्या. त्यावर काहींनी अतिक्रमण काढून देखील घेतले आहे.

कोपरगावात बांधकाम विभागाचा अतिक्रमणावर हातोडा; कडक पोलीस बंदोबस्तात स्टेशनरोड परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात
कोपरगाव (जि. अहमदनगर ) : राज्य मार्ग ६५ असलेल्या कोपरगाव स्टेशन रोडवर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतील अतिक्रमण बुधवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने कडक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.
यापूर्वी १०० ते १२५ अतिक्रमण धारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात दोनवेळा नोटीस बजावल्या होत्या. त्यावर काहींनी अतिक्रमण काढून देखील घेतले आहे. उर्वरित अतिक्रमण हे दोन जेसीबी मशीनच्या साह्याने दिवसभरात काढण्यात येणार असून या मोहिमेसाठी बांधकाम विभागाचे १५ अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणेचा ३० पेक्षाजास्त अधिकारी, कर्मचारी यांचा पोलीस फाटा तैनात असल्याची माहिती कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता वर्षराज शिंदे दिली आहे.