श्री राम मंदिराचे निर्माण हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:19 AM2021-01-18T04:19:12+5:302021-01-18T04:19:12+5:30
अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी देशभर निधी संग्रह अभियान सुरू झाले असून, त्या अंतर्गत अभियान समितीच्या कोल्हार ...
अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी देशभर निधी संग्रह अभियान सुरू झाले असून, त्या अंतर्गत अभियान समितीच्या कोल्हार उपखंडातील २८ गावांचा निधी संग्रह अभियान शुभारंभ श्री संत तुकाराम महाराज मठाचे महंत उध्दव महाराज मंडलिक आणि माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील याच्या हस्ते ग्रामदैवत श्री भगवतीमाता मंदिरात करण्यात आला. यावेळी विखे बोलत होते.
उध्दव महाराज मंडलिक म्हणाले, सर्वांच्या हृदयात राम आहे. पिढ्यान्पिढ्या भजन, कीर्तनातून भक्तिभावाने राम जागवला गेला. राम जन्मभूमी मंदिर निर्माणाचे स्वप्न सर्वांनी पाहिले त्यासाठी संघर्षही झाला. श्री राम जन्मभूमी मंदिराचे स्वप्न साकारण्यासाठी निधी संग्रह अभियानांतर्गत देशभरातील सर्व जातीधर्मातील लोक तसेच आबालवृद्ध आपापल्या परीने योगदान देत आहेत. या रामकार्यात सर्वांनी सहभागी व्हावे आणि या देवकार्यात आपला खारीचा वाटा उचलावा.
अभियान शुभारंभ प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाला. शिवाजी उदावंत यांनी प्रास्ताविक केले. नगर संघचालक भारतराव निमसे, सुरेंद्र खर्डे, अजित कुंकूलोळ यांनी मदत केली. ऋषी खर्डे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी कोल्हार देवालय ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे, भगवतीपूरचे माजी सरपंच रावसाहेब खर्डे, अशोकलाल आसावा, राजेंद्र कुंकूलोळ, धनंजय दळे, गणेश हारदे, डॉ. जयराम खंडेलवाल उपस्थित होते.
( १७ लोणी )