वैभव कॉलनीत दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:49+5:302021-04-06T04:19:49+5:30

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत दिघे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. यावेळी दादा वाघ, अजयकुमार गुप्ता, ...

Contaminated water supply in Vaibhav Colony | वैभव कॉलनीत दूषित पाणीपुरवठा

वैभव कॉलनीत दूषित पाणीपुरवठा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत दिघे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. यावेळी दादा वाघ, अजयकुमार गुप्ता, शेखर काळे, मंगलेश गुप्ता व वैभव कॉलनी येथील रहिवासी मंदाकिनी दिघे, पद्मा कुलकर्णी, शुभांगी केसकर, अश्विनी वैद्य, स्मिता पिपाडा, अंकिता देवचके, आरती वाघ, जयश्री राऊत, सुवर्णा पवार, तृप्ती चव्हाण, शारदा वैद्य, नीता चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महानगरपालिकेच्या वाॅर्ड क्रमांक ५ मधील वैभव कॉलनी परिसरात बंदिस्त पाईप गटार योजनेचे काम अत्यंत घाईघाईने करण्यात आले. यावेळी जुन्या ड्रेनेज लाईनचे पाईप जेसीबीच्या सहाय्याने काढताना या भागातील पिण्याचे पाणीपुरवठा करणारे पाईप व नळ जोड अनेक ठिकाणी उखडले गेले. त्यामुळे ही संपूर्ण पाईपलाईन येथील नागरिकांना स्वखर्चाने बदलून घ्याव्या लागल्या. त्याचा नाहक आर्थिक भुर्दंड येथील रहिवाशांना सोसावा लागला.

श्री संत गाडगेबाबा वसतिगृह ते वैभव कॉलनीतील शेवटच्या अपार्टमेंटकडे जाणारा ५०० मीटर लांबीचा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वैभव कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करावे तसेच रामेश्वर मंदिर परिसर व वैभव कॉलनीतील रस्त्याच्या दुतर्फा स्ट्रीट लाईट एलईडी व हायमॅक्स बसविण्यात यावेत. या परिसरात पूर्णदाबाने पुरेशा प्रमाणात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा.

वैदूवाडी ते वैभव कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये टाकण्यात आलेले खडी, वाळू, विटा व सिमेंट हे बांधकाम साहित्य ताबडतोब हटवून हा रस्ता वैभव कॉलनीतील राहिवाशांच्या रहदारीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Contaminated water supply in Vaibhav Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.