थिरकण्यासाठी ‘काऊंटडाऊन’ सुरू

By Admin | Published: October 26, 2016 12:41 AM2016-10-26T00:41:51+5:302016-10-26T00:56:31+5:30

औरंगाबाद : तरुणाईला आता दोन नोव्हेंबरच्या सायंकाळचे वेध लागले आहेत. दिवाळीनंतर रॉक संगीताच्या जल्लोषात ‘ती’ एक संध्याकाळ अविस्मरणीय बनवण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत.

Continue to 'Countdown' for the Throwing | थिरकण्यासाठी ‘काऊंटडाऊन’ सुरू

थिरकण्यासाठी ‘काऊंटडाऊन’ सुरू


औरंगाबाद : तरुणाईला आता दोन नोव्हेंबरच्या सायंकाळचे वेध लागले आहेत. दिवाळीनंतर रॉक संगीताच्या जल्लोषात ‘ती’ एक संध्याकाळ अविस्मरणीय बनवण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत.
‘टाटा टी गोल्ड’ प्रस्तुत ‘लोकमत रॉक आॅन २ - लाईव्ह इन कॉन्सर्ट’ला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता पुढे अनेक वर्षे या दिवसाची लोक आठवण काढतील असे दिसतेय.
‘रॉक आॅन २’ सिनेमातील कलावंत जेव्हा स्टेजवर स्फोटक परफॉर्मन्स देतील तेव्हा ‘टाटा टी’च्या चहाप्रमाणे सळसळणारा उत्साह व जोश कॉन्सर्टच्या माध्यमातून अनुभवायला मिळेल. तत्पूर्वी यंगस्टर्सने शहरात सुरू असणाऱ्या विविध पासेस केंद्रावर तुफान गर्दी केली. देवगिरी इंजिनिअरिंग, एमजीएम-जेएनईसी, एमआयटी आणि पीईएस इंजिनिअरिंग कॉलेज, चाटे कोचिंग क्लासेसच्या एन-३ व औरंगपुरा शाखा आणि प्रोझोन मॉल येथे विद्यार्थ्यांची दिवसभर लगबग सुरू होती.
शहरात होणाऱ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ते आतुर झाले आहेत. बीड बायपास रोडवरील जबिंदा इस्टेट येथे होणाऱ्या या कॉन्सर्टचे ‘एम. के. कन्स्ट्रक्शन्स’ व ‘ई-राईडस्’सहप्रायोजक आहेत.
‘टाटा टी गोल्ड’सोबत दोन पासेस फ्री!
औरंगाबादकरांची सकाळ तरतरीत करणाऱ्या ‘टाटा टी गोल्ड’तर्फे एक खास आॅफर देण्यात आली आहे. लोकमत भवनच्या रिगल लॉनमध्ये २५० ग्रॅम टाटा टी गोल्ड मिक्स्चरचे पाकीट विकत घेतल्यास त्यासोबत दोन पासेस मोफत मिळतील. सोबत एक प्लास्टिक जारसुद्धा दिला जाणार. तसेच टाटा टी गोल्ड मिक्स्चरचे रिकामे पाकीट रिगल लॉन येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान आणून त्याबदल्यातसुद्धा दोन पासेस तुम्ही घेऊन जाऊ शकता. आहे ना ‘दिल खुश’ करणारी आॅफर!

Web Title: Continue to 'Countdown' for the Throwing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.