‘अमृत’चा ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:21 AM2021-02-10T04:21:40+5:302021-02-10T04:21:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असताना अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवित आहेत, अशा शब्दात ...

Is the contractor of 'Amrut' the son-in-law of the Municipal Corporation? | ‘अमृत’चा ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का ?

‘अमृत’चा ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का ?

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहरातील खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असताना अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवित आहेत, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत अमृत भुयारी गटार योजनेचे काम घेतलेले ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का? असा थेट सवाल स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी सभागृहात उपस्थित केला.

सभापती मनोज कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महापालिकेत स्थायी समितीची सभा झाली. सभेला सदस्य डॉ. सागर बोरुडे, श्याम नळकांडे, प्रकाश भागानगरे, सोनाबाई शिंदे, सुप्रिया जाधव, उपायुक्त डॉ. प्रदीप पटारे, यशवंत डांगे आदी उपस्थित होते. शहरात भूमिगत गटार टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. खोदलेले रस्ते ठेकेदाराकडून दुरुस्त केले गेले नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम रखडल्याने सर्वत्र धूळ झाली आहे. डॉ. बोरुडे म्हणाले, शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहने शहरातून येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यात रस्ते खोदून ठेवल्याने धूळ उडते आहे. यावर कोतकर म्हणाले, भुयारी गटारीचे देताना नेमकं काय ठरले होते. त्यानुसार ठेकेदार काम करतो आहे किंवा नाही, याची पाहणी न करता अधिकारी कायार्लयात बसून केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचा आरोप कोतकर यांनी केला. हाच धागा पकडत प्रकाश भागानगरे म्हणाले, शहरातील भुयारी गटार योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. धुळीने नागरिक त्रस्त आहेत. नागिरकांकडून या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नगरसवेकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ठेकेदाराने काम न केल्यास कडक कारवाई करावी, अशी मागणी भागानगरे यांनी केली.

....

जन्म-मृत्यूचे दाखले घरपोहोच

जन्म-मृत्यूचे दाखले वेळेत मिळत नाहीत. एका दाखल्यासाठी दीड ते दोन हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप करत या विभागाचे खासगीकरण करा, असा आदेश सभापती कोतकर यांनी यावेळी केला. यावर बराच वेळ झाल्यानंतर दाखले घरपोहोच देण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

...

विद्युतच्या वादग्रस्त देयकांसाठी अभियंत्यांची समिती

महापालिकेच्या विद्युत विभागातील चार वर्षांपूर्वीची बिले दिले गेले नाहीत. विद्युत अभियंता नसल्याने ही देयके अदा केली गेली नाहीत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही देयके अदा करण्यासाठी अभियंत्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

...

दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक

विद्युत विभागातील देयकांबाबत खुलासा करताना अभियंता आर. जी. मेहत्रे यांनी मी विद्युत अभियंता नाही. ही कामे चार वर्षांपूर्वीच आहेत. ही कामे तपासून देयके अदा करण्यासाठी विद्युत अभियंत्यांची नियुक्ती करावी, असे सांगितले. त्यावर उपायुक्त यशवंत डांगे यांनी भूमिका मांडली. ही देयके तपासण्यासाठी विद्युत अभयंताच असाला पाहिजे असे काही नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करू नका, अशा शब्दात डांगे यांनी अभियंत्यांना सुनावले.

.....

विनाचर्चा निविदांना मंजुरी

विविध विकासकामांच्या कोट्यवधींच्या निविदा अंतिम मंजुरीसाठी सभेसमोर होत्या. या निविदांवर चर्चा न करता मंजुरी देण्यात आली आहे. निविदांच्या मंजुरीवरून महापालिकेत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

..

सूचना फोटो आहे.

Web Title: Is the contractor of 'Amrut' the son-in-law of the Municipal Corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.