ग्रामीण भागाच्या विकासासाठी माध्यमांचे योगदान गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:14 AM2021-02-22T04:14:41+5:302021-02-22T04:14:41+5:30

नेवासा : ग्रामीण विकासातील अडथळे दूर करण्यासाठी आता माध्यमांनी योगदान देणे गरजेचे आहे. तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोनातून ग्रामीण विकासासाठी प्रयत्न ...

The contribution of media is needed for the development of rural areas | ग्रामीण भागाच्या विकासासाठी माध्यमांचे योगदान गरजेचे

ग्रामीण भागाच्या विकासासाठी माध्यमांचे योगदान गरजेचे

नेवासा : ग्रामीण विकासातील अडथळे दूर करण्यासाठी आता माध्यमांनी योगदान देणे गरजेचे आहे. तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोनातून ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत उदयन गडाख यांनी व्यक्त केले.

नेवासा येथे शिवजयंतीनिमित्त मराठा सुकाणू समितीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष गणेश झगरे यांच्या अध्यक्षतेखाली व उदयन गडाख यांच्या हस्ते मराठा भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

‘लोकमत’ प्रतिनिधी सतीश उदावंत, पत्रकार करण नवले, आदर्श सरपंच योगेश म्हस्के, पत्रकार चंद्रकांत दरंदले, कादंबरीकार गणेश निकम, मंगलकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक शेळके, वन्यप्राणी संवर्धक विलास म्हस्के यांना मराठा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गडाख म्हणाले, समाजात काम करताना मानपान पाहण्यापेक्षा कामाला व सामान्य माणसाच्या हिताला महत्त्व देण्याची शिकवण ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दिली. त्यानुसार मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत.

यावेळी सुभाष गागरे, पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे, किशोर भणगे, निलेश निपुंगे, रावसाहेब घुमरे, अशोक कोळेकर, नगरसेवक सचिन वढागळे, नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर, कल्याणराव कांगुणे, दत्तात्रय कोळेकर, जालिंदर बर्डे उपस्थित होते.

----

२१ नेवासा अवार्ड

नेवासा येथे उदयन गडाख यांच्या हस्ते मराठा भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Web Title: The contribution of media is needed for the development of rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.