सेवानिवृत्तीनंतरही संस्थेच्या विकासात शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:01+5:302021-06-01T04:16:01+5:30
दहिगावने : निश्चित वयोमानानुसार शिक्षक ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून सेवानिवृत्त होतात. मात्र त्यानंतरही सेवानिवृत्त शिक्षकांनी सेवा दिलेल्या संस्थेच्या भौतिक, शैक्षणिक, ...
दहिगावने : निश्चित वयोमानानुसार शिक्षक ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून सेवानिवृत्त होतात. मात्र त्यानंतरही सेवानिवृत्त शिक्षकांनी सेवा दिलेल्या संस्थेच्या भौतिक, शैक्षणिक, गुणात्मक, सामाजिक विकासात या शिक्षकांचे निरंतर योगदान मिळणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी केले.
दहिगावने (ता. शेवगाव) येथे शिक्षकांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
दहिगावने येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध विद्यालयातील १७ शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा सोमवारी (दि.३१) नवजीवन विद्यालयात पार पडला. सेवापूर्तीनिमित्त प्राचार्य डी.एन. वाबळे, व्ही एस मरकड, टी.बी. जाधव, नवाब शेख, गोरक्षनाथ ठोंबळ, अजिनाथ डाके, प्रा. अशोक नरवडे, साहेबराव कुसारे, शिवाजी आव्हाड, पंढरीनाथ मरकड, दिगंबर आव्हाड, सुरेश आव्हाड, बाळासाहेब ब्राह्मणे, तुळशीराम खंडागळे, राजाराम मोरे, आकाश पाठे, ज्ञानदेव गुंजाळ यांचा डॉ. नरेंद्र घुले यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक प्रा. अशोक नरवडे व उपप्राचार्य गोरक्षनाथ ठोंबळ म्हणाले, गोरगरिबांच्या पाल्यांच्या भावविश्वाला आकार देणारी ही संस्था आहे. येथे काम करणारे शिक्षकही तेवढेच भाग्यवान आहेत. यावेळी केव्हीके प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक, जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी के.वाय. नजन, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, बबनराव भुसारी, सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, विष्णू जगदाळे, प्रा. काकासाहेब घुले, रावसाहेब मरकड, प्रा. मकरंद बारगुजे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. अशोक उगलमुगले यांनी केले. सिकंदर शेख यांनी आभार मानले.
--
३१ दहिगावने
दहिगावने येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षकांचा सेवापूर्तीनिमित्त डॉ. नरेंद्र घुले यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला.