महापुरुषांना भारतरत्न देण्यावरूनचा वाद अयोग्य- प्रफुल्ल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 04:28 AM2020-01-05T04:28:56+5:302020-01-05T04:29:03+5:30

देशात अनेक महापुरूष होऊन गेले़ भारतरत्न देऊन सरकार त्यातील कुणाचा सन्मान करत असेल तर त्यात वाद उपस्थित करणे योग्य नाही़

The controversy over granting Bharat Ratna to Legends will be inappropriate | महापुरुषांना भारतरत्न देण्यावरूनचा वाद अयोग्य- प्रफुल्ल पटेल

महापुरुषांना भारतरत्न देण्यावरूनचा वाद अयोग्य- प्रफुल्ल पटेल

शिर्डी : देशात अनेक महापुरूष होऊन गेले़ भारतरत्न देऊन सरकार त्यातील कुणाचा सन्मान करत असेल तर त्यात वाद उपस्थित करणे योग्य नाही़ तसेच या वादात आम्हाला ओढू नये, असे सांगत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत एक प्रकारे समर्थन दर्शवले आहे़
पटेल यांनी सालाबादप्रमाणे यंदाही नववर्षाच्या पहिल्या सप्ताहात साईदरबारी हजेरी लावली़ यावेळी संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व बिपीन कोल्हे यांनी पटेल यांचा संस्थानच्या वतीने सत्कार केला़ साईदर्शनानंतर पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पटेल म्हणाले, तीन पक्षाचे सरकार असल्याने सुरूवातीला छोट्या समस्या उद्भवत असतात़ सर्व आमदारांना मंत्रीपद देणे शक्य नाही. जे शक्य आहे ते तीनही पक्ष करत आहेत़ सोमवारपर्यंत सर्व मंत्री आपआपल्या खात्याचा कारभार सांभाळतील़ तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम बनवण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही बाबीचा परिणाम होणार नाही व सरकार पाच वर्षे कारभार करेल.

Web Title: The controversy over granting Bharat Ratna to Legends will be inappropriate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.