तरुणाईमुळे कान्हूरपठार लसीकरण केंद्रावर सुसूत्रता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:41+5:302021-05-11T04:20:41+5:30
कान्हूरपठार : कान्हूरपठार (ता. पारनेर) येथे लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे होणारे हाल टाळण्यासाठी येथील काही तरुण व ...
कान्हूरपठार : कान्हूरपठार (ता. पारनेर) येथे लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे होणारे हाल टाळण्यासाठी येथील काही तरुण व आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. शनिवारपासून लसीकरणाच्या सर्व प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नियोजपूर्वक काम सुरू केले.
लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी अभ्युदय बँकेचे संचालक मोहन घनदाट यांच्या वतीने २५ खुर्च्या देण्यात आल्या. उद्योजक राजेश भंडारी यांनी २५ लीटर सॅनिटायझर, मंगेश प्रतापराव ठुबे यांच्याकडून मंडप व्यवस्था, गोकूळ ठुबे व संतोष ठुबे यांनी पाणी व मास्क व्यवस्था व पोपट नवले गुरुजी यांनी बिस्कीट पुडे देण्याचा निर्णय घेतला.
लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना या विविध सुविधा पुरवण्यात येत आहेत. तसेच शिस्तबद्ध आणि काटेकोर नियोजनासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे स्वयंसेवक यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कामात नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर स्वयंसेवकांनी फवारणी करून परिसर निर्जंतुक केला.
स्वयंसेवक म्हणून अरविंद लोंढे, चंद्रभान ठुबे, अंकुश ठुबे, श्रीकांत ठुबे, अरुण गायकवाड, तुषार सोनावळे, संजू सोनावळे, सचिन गायखे, विजय काकडे, कैलास जडगुले, प्रमोद खामकर यांनी काम पाहिले.
--
१० कान्हूर पठार
कान्हूर पठार प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना येथील तरुणांनी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. याबाबतचे साहित्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना गावातील तरुण.