कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील दोषींना लवकर फाशी द्या, सकल मराठा समाजाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:38 IST2017-11-30T16:36:32+5:302017-11-30T16:38:00+5:30
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यात आली. संविधानामुळेच निर्भयाला न्याय मिळाला असून दोषींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबाजवणी लवकर व्हावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.

कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील दोषींना लवकर फाशी द्या, सकल मराठा समाजाची मागणी
संगमनेर : कोपर्डी खून खटल्याच्या निकालाचे सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यात आली. संविधानामुळेच निर्भयाला न्याय मिळाला असून दोषींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबाजवणी लवकर व्हावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.
कोपर्डी खून खटल्याच्या निकालाचे स्वागत करण्यासाठी गुरूवारी संगमनेर येथील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाशिक-पुणे महामार्गावर एकत्र जमले. राजाभाऊ देशमुख, शरद थोरात, अमोल खताळ, अविनाश थोरात, अमोल कवडे, अशोक सातपुते, अविनाश सातपुते, प्रल्हाद शिंदे, बाळासाहेब देशमुख, धीरज देशमुख, योगेश देशमुख, बाबू नालकर यांसह अनेकांनी एकत्र येत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी न्यायालयात भक्कम युक्तीवाद केल्याने आरोपींना फाशी झाल्याने त्यांचे आभार मानण्यात आले. कुठलीही जात-पात न बघता महिला भगिंनीच्या रक्षणासाठी आम्ही सज्ज असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.