पुन्हा कोपर्डी घडू नये ; नीलम गो-हे यांनी कुळधरण येथे मुलींशी साधला सवांद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:06 PM2017-12-02T16:06:42+5:302017-12-02T16:07:10+5:30
भविष्यात कोपर्डी, कोठेवाडीसारख्या घटना घडू नयेत म्हणून राज्यात समुपदेशन शिबिराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात कोपर्डी येथून केली जाईल, अशी ग्वाही शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार निलमताई गो-हे यांनी दिली.
कर्जत : भविष्यात कोपर्डी, कोठेवाडीसारख्या घटना घडू नयेत म्हणून राज्यात समुपदेशन शिबिराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात कोपर्डी येथून केली जाईल, अशी ग्वाही शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार निलमताई गो-हे यांनी दिली.
शनिवारी गो-हे यांनी कोपर्डी येथे पीडित कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रोजेक्टर व संगणक भेट दिला. यावेळी सरपंच रोहिनी सुर्यभान सुद्रिक, लालासाहेब सुद्रिक आदी उपस्थित होते. गो-हे यांनी सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच कुळधरण येथील नुतन मराठी विद्यालयात विद्याथीनींशी संवाद साधला. यावेळी गो-हे म्हणाल्या, सुरक्षित व निर्भयपणे जीवन जगण्यासाठी मुलींमध्ये धाडस तयार होणे गरजेचे आहे. यासाठी मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुली व मुलांसाठी व्यायामशाळा देणार आहे. यासाठी एक लाख रुपयांचा निधी मंजूर केला. कोपर्डी येथील छकुलीच्या नावाने वाचनालय सुरू करणार आहे. यासाठी पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर केला. भविष्यात कोपर्डी व कोठेवाडी सारख्या घटना घडू नयेत म्हणून राज्यात समुपदेशन शिबिर शिवसेना सुरू करणार आहे. याचा शुभारंभ कोपर्डी येथे करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, पालक यांना सामावून घेतले जाणार आहे, असे सांगितले. यावेळी जेष्ठ नेते बापूसाहेब गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष महेंद्र गुंड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बिभीषण गायकवाड, कर्जत पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, कर्जत शहरप्रमुख गणेश क्षीरसागर, मुख्याध्यापक सुर्यभान सुद्रिक, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक, बिभीषण खोसे आदी उपस्थित होते. यानंतर त्यांनी कर्जत येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. पुस्तके भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याध्यापक युसूफ शेख आदी उपस्थित होते.