पाथर्डीमधील तनपूरवाडीच्या केंद्रातील प्रकारशिक्षण विभागाच्या आशीर्वादाने ‘कॉपी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:45 AM2019-03-01T11:45:32+5:302019-03-01T11:45:37+5:30
तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांमधून बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत शिक्षण विभागाच्या आशीवार्दाने काही परीक्षा केंद्रांमध्ये एका बाकावर दोन-दोन, तीन-तीन विद्यार्थी बसवून सामूहिक कॉपीस प्रोत्साहन दिले जात असल्याचा प्रकार बुधवारी पहावयास मिळाला.
पाथर्डी: तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांमधून बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत शिक्षण विभागाच्या आशीवार्दाने काही परीक्षा केंद्रांमध्ये एका बाकावर दोन-दोन, तीन-तीन विद्यार्थी बसवून सामूहिक कॉपीस प्रोत्साहन दिले जात असल्याचा प्रकार बुधवारी पहावयास मिळाला.
बुधवारी बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची परीक्षा होती. या परीक्षेसाठी तनपूरवाडी येथील संत भगवानबाबा उच्च माध्यमिक विद्यालयात एकाच बाकावर दोन-दोन, तीन-तीन विद्यार्थी बसवून सर्रास सामूहिक कॉपी सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान आढळून आले. तर विद्यालयाच्या बाहेर कॉप्यांचा सडा पडला होता.
बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच तालुक्यातील प्रत्येक केंद्रावर विद्यार्थी सर्रासपणे कॉपी करीत असल्याचे दिसत होते. हा सर्व प्रकार घडत असताना संस्थांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
एका बाकावर दोन-दोन विद्यार्थी बसवून सामूहिक पद्धतीने परीक्षकांसमोरच पेपर सोडविला जात असल्याचे दिसत असताना शिक्षण विभाग या गैरप्रकाराकडे डोळेझाक करताना दिसून येत आहे.
कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्यांना कर्मचारी मदत करीत नाहीत. परीक्षा सुरू असताना एखादा परीक्षार्थी उठला असेल. जिल्ह्याबाहेरील प्रवेश आमच्या विद्यालयात नाहीत. -बालम शेख, मुख्याध्यापक, संत भगवानबाबा विद्यालय, तनपूरवाडी.