साईसच्चरित्रकार दाभोळकरांच्या नातीने दिली संस्थानला साईसच्चरित्राच्या पहिल्या आवृत्तीची प्रत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:35 AM2019-10-12T11:35:40+5:302019-10-12T11:36:58+5:30

साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बाबांना किंवा संस्थानला भेट देता आले नाही. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांनी त्यांच्या नातीने १०१ व्या साई पुण्यतिथीचे औचित्य साधून १९३० साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या साईसच्चरित्राच्या आवृत्तीची मुद्रित प्रत संस्थानला भेट दिली.

A copy of the first edition of the psychecharitra is given to the Institute by the name of Dabholkar. | साईसच्चरित्रकार दाभोळकरांच्या नातीने दिली संस्थानला साईसच्चरित्राच्या पहिल्या आवृत्तीची प्रत भेट

साईसच्चरित्रकार दाभोळकरांच्या नातीने दिली संस्थानला साईसच्चरित्राच्या पहिल्या आवृत्तीची प्रत भेट

शिर्डी : साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बाबांना किंवा संस्थानला भेट देता आले नाही. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांनी त्यांच्या नातीने १०१ व्या साई पुण्यतिथीचे औचित्य साधून १९३० साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या साईसच्चरित्राच्या आवृत्तीची मुद्रित प्रत संस्थानला भेट दिली.
दाभोळकरांची वयोवृद्ध नात अंजली प्रधान-दाभोळकर यांनी ही अमूल्य भेट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, डॉ़आकाश किसवे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.
१९१० साली अण्णासाहेब सर्वप्रथम शिर्डीला आले. पहिल्या भेटीतच बाबांनी त्यांना हेमाडपंत ही पदवी बहाल करत साईसच्चरित्र लेखनास अनुमती दिली. अण्णासाहेबांनी लेखनाची सुरूवात मात्र बाबांच्या निर्वाणानंतर चार वर्षांनी १९ मार्च १९२२ रोजी गुढीपाडव्याला केली. त्यांनी जसे जसे अध्याय लिहिले तसे हे अध्याय १९२३ पासून संस्थानच्या साईलिला मासिकात क्रमश: प्रसिद्ध करण्यात आले. शेवटचा एकावन्नावा अध्याय साईलिलेत छापायला पाठवल्यानंतर दोनच दिवसांनी १५ जुलै १९२९ रोजी दुपारी अण्णासाहेबांचे हृदयविकाराने निधन झाले.
अण्णासाहेब ५२ वा अध्याय अवतरणीका म्हणून लिहिणार होते. मात्र अण्णासाहेबांच्या मृत्यूनंतर बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब देव यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी बावन्नव्या अध्यायाची अण्णासाहेबांनी काढलेली टिपणे बघितली. मात्र त्यांना अवतरणीका सापडली नाही. त्यामुळे त्यांनी टिपणावरून ५२वा अध्याय पूर्ण केला. स्वत: अवतरणीका लिहून तो त्रेपन्नावा अध्याय म्हणून ग्रंथाला जोडला़ १९२९ पर्यंत साईलिलेतून क्रमश: प्रसिद्ध झालेले साईसच्चरित्र २६ नोव्हेंबर १९३० रोजी सर्वप्रथम ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले. 
आजवर १६ भाषेबरोबरच संस्थानने साईसच्चरित्राच्या मराठीत तब्बल ३३ आवृत्या प्रसिद्ध केल्या असल्या तरी संस्थान दप्तरी पहिल्या आवृत्तीची प्रत नव्हती़ मुगळीकरांच्या विनंतीवरून अंजली प्रधान यांनी ती संस्थानला भेट दिली. ही प्रत सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

Web Title: A copy of the first edition of the psychecharitra is given to the Institute by the name of Dabholkar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.