कोरोनामुळे यंदा साईज्योती प्रदर्शनालाही फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:47+5:302021-01-09T04:17:47+5:30

जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी जानेवारीमध्ये साईज्योती बचत गट महिला प्रदर्शन भरविले जाते. २००९ पासून या प्रदर्शनास ...

Corona also tore down the Saijyoti exhibition this year | कोरोनामुळे यंदा साईज्योती प्रदर्शनालाही फाटा

कोरोनामुळे यंदा साईज्योती प्रदर्शनालाही फाटा

जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी जानेवारीमध्ये साईज्योती बचत गट महिला प्रदर्शन भरविले जाते. २००९ पासून या प्रदर्शनास सुरुवात झाली होती. महिला बचत गटांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू, मसाले, सेंद्रिय उत्पादने, हस्तकला यांच्या साहित्यांचे हे प्रदर्शन भरविण्यात येत असे. प्रत्येक वर्षी नगरकरांनी या प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे नाशिक विभागातील तब्बल पाच जिल्ह्यांचे प्रदर्शन एकट्या नगरमध्ये घेण्यात आले. यंदा मात्र, महिला बचत गटाच्या प्रदर्शनाची ही परंपरा खंडित होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे यंदाचे प्रदर्शन रद्द करण्यात आल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले.

......................

बचत गटांचे नुकसान

गेल्या दहा वर्षांत या प्रदर्शनाच्या माध्यमातून बचत गटांची सुमारे २२ कोटींची उलाढाल झालेली आहे. प्रदर्शात सहभागी होणाऱ्या शेकडो बचत गटांच्या हजारो महिलांना यानिमित्ताने रोजगार मिळाला होता.

परंतु यंदा प्रदर्शन रद्द झाल्याने बचत गटांचे मोठे नुकसान होणार आहे.

Web Title: Corona also tore down the Saijyoti exhibition this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.