श्रीगोंदेकरांसाठी २४ हजार मास्कचे कोरोना कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:35+5:302021-06-25T04:16:35+5:30

काष्टी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या मंजूषा वर्मा यांनी श्रीगोंदा तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी ...

Corona armor of 24,000 masks for Shrigondekar | श्रीगोंदेकरांसाठी २४ हजार मास्कचे कोरोना कवच

श्रीगोंदेकरांसाठी २४ हजार मास्कचे कोरोना कवच

काष्टी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या मंजूषा वर्मा यांनी श्रीगोंदा तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी एन-९५चे २४ हजार मास्क दिले आहेत.

या मास्क वाटपाचा प्रारंभ आमदार बबनराव पाचपुते, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, मंजूषा वर्मा, तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर यांच्या हस्ते काष्टी (ता.श्रीगोंदा) भिल्ल वस्तीत करण्यात आले. यावेळी भिल्ल वस्तीत महामानव बाबा आमटे सेवा संस्थेने घेतलेल्या कूपनलिकेचे उद्घाटन, वृक्षारोपण करण्यात आले.

काष्टी येथील घोड नदीच्या तिरावरील भिल्ल वस्ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागरी सुविधांपासून वंचित होती. महामानव बाबा आमटे संस्थेच्या माध्यमातून सुविधांचा सूर्योदय झाला. नागरिकांचे रेशनकार्ड, जातीचे दाखले, बँकेत खाते उघडून देण्याचे काम केले आहे. बबनराव पाचपुते यांनी भिल्ल समाजातील नागरिकांसाठी घरकुले उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामपंचायत सदस्यांना सूचना दिल्या. मंजूषा वर्मा म्हणाल्या, आरोग्य सुविधांबरोबरच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. यावेळी गिरीश कुलकर्णी, नितीन खामकर, उपसरपंच सुनील पाचपुते, दत्तात्रय जगताप, डॉ. वैशाली चौधरी, ग्रामविकास अधिकारी संदीप लगड यांची भाषणे झाली.

यावेळी लालासाहेब फाळके, डॉ. सचिन जाधव, उद्धव गायकवाड, डॉ. अरुण रोडे, चांगदेव पाचपुते, महेश दरेकर उपस्थित होते.

----

२४ काष्टी

काष्टी येथे मंजूषा वर्मा यांनी आणलेल्या मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार बबनराव पाचपुते व इतर.

Web Title: Corona armor of 24,000 masks for Shrigondekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.