कोरोना होतोय हद्दपार; मात्र काळजी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:09+5:302021-06-17T04:15:09+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये श्रीरामपूर तालुक्यात रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदविला गेला. शहरात रुग्णालयांचे मोठे जाळे असूनही बेड्ससाठी नगर, नाशिक, पुणे व ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये श्रीरामपूर तालुक्यात रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदविला गेला. शहरात रुग्णालयांचे मोठे जाळे असूनही बेड्ससाठी नगर, नाशिक, पुणे व औरंगाबाद येथे धाव घ्यावी लागली. आता मात्र स्थिती पूर्णपणे बदलली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली असून, सर्वत्र बेड्स रिकामे आहेत. त्यामुळे प्रशासनाबरोबरच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
शहरातील मोरगे हॉस्पिटल (११), साई कोविड सेंटर (१), साईश्रद्धा (२), संजीवन (५), आनंद कोविड सेंटर (५), पवनपुत्र (१) येथील रुग्णसंख्या आता कमालीने घटली आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे सर्वच रुग्णालये आता इतर आजारांच्या रुग्णांना भरती करून घेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
---------
कोविड सेंटरची स्थिती
ग्रामीण रुग्णालय : १६
डॉ.आंबेडकर वसतिगृह : १०
खासगी सेंटर : २६
जि.प.शाळा : ४
एकूण बेड्स क्षमता : २२२४
---------
खासगी रुग्णालय
एकूण रुग्ण : २५
एकूण रुग्णालये : १७
बेड्स क्षमता : ६७४
---------
नियमांचे पालन गरजेचे
शहरात हॉटेल्स, मॉल्स व इतर सर्व दुकाने नियमित वेळेत सुरू झाली आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होण्याची शक्यता आहे. मात्र नियंत्रणात आलेली परिस्थिती टिकविण्यासाठी पूर्वीप्रमाणेच सर्व नियम पाळावे, असे आवाहन डॉ.मोहन शिंदे यांनी केले आहे.
--------