श्रीगोंदा शहरातील एकाच कुंटुबांतील सहा जणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 11:11 AM2020-07-13T11:11:01+5:302020-07-13T11:17:49+5:30
श्रीगोंदा - श्रीगोंदा शहरातील एकाच कुंटुबांतील सहा जणांना कोरोनाने विळखा घातला आहे. तसेच बगाडे कॉर्नर परिसरात राहणाऱ्या एकास कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोळगावमध्ये पुन्हा रुग्ण सापडला आहे. वडाळीतील एका रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजते. मात्र हा रिपोर्ट वैद्यकीय विभागाने राखून ठेवला आहे.

तालुक्यात २९ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. १२ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यावर उपचार चालू आहेत. सर्वांची प्रकृती सुधारत आहे.
श्रीगोंदा शहरात राहणाºया डॉक्टरांना सासुरवाडीत कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्याच कुंटुबांतील पाच जण कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये डॉक्टर वगळता इतर रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळली नाही तरी ते कोरोना बाधित निघाले आहेत. त्यामुळे या सर्व रुग्णावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
बगाडे कॉर्नरवरील कोरोनाबाधित रुग्ण कुणाच्या संपर्कात आला होता. त्या रुग्णाच्या आणखी कोण कोण संपर्कात आले आहेत, याची शोध मोहीम आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
------------------------
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने माक्स लावणे व सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, तसेच वारंवार हात धुणे गरजेचे आहे.
- डॉ. नितीन खामकर, तालुका वैद्यकीय अधिकारी