कोरोनामुळे श्रीगोंद्यात रूट मार्च; युवा सेनेने केली पोलिसांवर पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:16 AM2020-06-07T11:16:45+5:302020-06-07T11:20:53+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविवारी श्रीगोंदा शहरातून रूट मार्च केले. त्यावेळी युवा सेनेच्या वतीने तसेच नागरिकांच्या वतीने जैन पंच वाडा ते झेंडा चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
श्रीगोंदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविवारी श्रीगोंदा शहरातून रूट मार्च केले. त्यावेळी युवा सेनेच्या वतीने तसेच नागरिकांच्या वतीने जैन पंच वाडा ते झेंडा चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
मास्टर अनिल ननवरे यांनी गाण्यातून स्वागत केले. नागरिकांनी पोलिसांवर पुष्पवृष्टी करून आम्हाला अधिक काम करण्याची उर्मी मिळणार आह, असे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सांगितले.
युवा सेनेचे तालुका प्रमुख हरिभाऊ काळे यांनी म्हणाले, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी नोकरी म्हणून नव्हे तर समाजाचा मी एक घटक या नात्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना काळात जे परिश्रम घेतले ते निश्चितच कौतुकास पात्र आहे.
यावेळी युवासेना उपजिल्हा बाळासाहेब दुतारे, सेनेचे शहर प्रमुख संतोष खेतमाळीस, योगेश भुतकर, निलेश काळे, अशोक सांगळे, सागर लोखंडे राहुल भालेकर, आरबाज मनियार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.