शिरापुरने उभे केले कोरोना सेंटर (टिप - बातमीत शब्द सिलेक्ट होत नाहीत, त्यामुळे वाचता येत नाहीये. कृपया पाहणे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:18 AM2021-04-26T04:18:51+5:302021-04-26T04:18:51+5:30
सेंटरमध्ये २५ बेड साधे व २५ बेड ऑक्सिजनचे असे ५० बेडची सुविधा करण्यात आली आहे. गावातील रूग्णास तातडीने गावातच ...
सेंटरमध्ये २५ बेड साधे व २५ बेड ऑक्सिजनचे असे ५० बेडची सुविधा करण्यात आली आहे. गावातील रूग्णास तातडीने गावातच उपचार मिळावेत, या हेतूने हे कोविड सेंटर सुरू केले आहे.
सध्या कोरोना रूग्णांना शहरात बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. या ठिकाणी फक्त गावातील लोकांनाच सुविध देण्यात येणार आहेत. जर रूग्णास तातडीने गावातच सुविधा मिळाली तर तो लगेचच कोविड सेंटरमध्ये भरती होईल. या कोविड सेंटरसाठी डॉ.भास्कर शिरोळे व डॉ. संतोष उचाळे काम पाहणार आहेत.
..........
आमच्या गावातील रूग्णांस शहरात बेड मिळविण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. जर ऑक्सिजन बेड किंवा वेळेत उपचार मिळाले नाहीत तर अनेकदा रूग्ण दगावत आहेत. भविष्यात हा आजार मोठ्या प्रमाणावर फोपावण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोठ मोठ्या गावात अशी कोविड सेंटर उभी करणे गरजेचे आहे.
- मधूकर उचाळे, माजी सभापती, कृषी व पशूसंवर्धन