कोरोनाची संचारबंदी : कुकडीचे अधिकारी, कर्मचारी पाणी नियोजनासाठी कालव्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 07:02 PM2020-03-25T19:02:04+5:302020-03-25T19:03:24+5:30
कोरोना विषाणुंचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात संचारबंदी जमावबंदी लागू आहे. अशी परिस्थिती असतानाही जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून कुकडी, घोड, सीना, विसापूरचे आवर्तन शेतकºयांना देण्यासाठी कालवा साईटवर काम करीत आहेत.
श्रीगोंदा : कोरोना विषाणुंचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात संचारबंदी जमावबंदी लागू आहे. अशी परिस्थिती असतानाही जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून कुकडी, घोड, सीना, विसापूरचे आवर्तन शेतकºयांना देण्यासाठी कालवा साईटवर काम करीत आहेत.
सर्व शेतकºयांना आवर्तनात पाणी मिळेल. त्यामुळे कालवा अथवा चारीवर कोणी गर्दी करु नये, असे आवाहन कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंतराव धुमाळ यांनी केले आहे.
शासनाने आजच्या बाजारभावाप्रमाणे २० ते २५ हजार कोटी रुपये निधी खर्च करून हे प्रकल्प उभारले आहेत. शेतकरी या प्रकल्पांचे मालक आहेत. जलसंपदा विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग, कालव्यांच्या अपुºया वहन क्षमता आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनीच मिळून पाण्याची बचत करणे महत्त्वाचे आहे. तरी सर्व शेतकºयांंनी पाटबंधारेच्या कर्मचाºयांना सहकार्य करावे, असे आवाहन अभियंता धुमाळ यांनी केले आहे.