‘या’ गावात कोरोनाचा उद्रेक; चार दिवसासाठी गाव लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 03:59 PM2021-01-29T15:59:43+5:302021-01-29T16:00:29+5:30
कोरोनाचे तब्बल सतरा रूग्ण आढळल्याने ग्रामस्थांनी चार दिवस पिंपळवाडी गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याचे राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले. या गावात नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात प्रचारादरम्यान हा संसर्ग गावात पसरल्याचे सांगण्यात येते.
शिर्डी : कोरोनाचे तब्बल सतरा रूग्ण आढळल्याने ग्रामस्थांनी चार दिवस पिंपळवाडी गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याचे राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले. या गावात नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात प्रचारादरम्यान हा संसर्ग गावात पसरल्याचे सांगण्यात येते.
शिर्डीलगत असलेल्या पिंपळवाडी सारख्या छोट्याशा गावात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून उद्या, शनिवारी पुणतांबा व राहाता आरोग्य केंद्रात सर्वांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
दरम्यान गावाने स्वयंस्फुर्तीने चार दिवसांचा लॉकडाऊन सुरू केला आहे. या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी सांगितले.
कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसिलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.