ऐंशी वर्षांचे हात राबताहेत कोरोना रुग्ण सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:20 AM2021-04-25T04:20:24+5:302021-04-25T04:20:24+5:30
एकनाथ बोऱ्हाडे हे सेवानिवृत्त शिक्षक मुलगा दीपकसह प्राथमिक शिक्षक घरात ७५ वर्षांची पत्नी, सुना, नातसून, पणतू असे सगळे पहाटे ...
एकनाथ बोऱ्हाडे हे सेवानिवृत्त शिक्षक मुलगा दीपकसह प्राथमिक शिक्षक घरात ७५ वर्षांची पत्नी, सुना, नातसून, पणतू असे सगळे पहाटे पाच वाजता उठून तयारीला लागतात. कोतूळ येथील रुग्णालयात कोरोना उपचारासाठी खेड्यापाड्यातील लोक आहेत.
दररोज शेवया, पोहे, उपमा, शिरा, इडली, अंडी, केळी असा नाश्ता तयार केला जातो.
विशेष म्हणजे त्यात टाेमॅटो, गाजर, फ्लावर अशा अनेक भाज्या टाकून तो पौष्टिक व सात्त्विक बनवला जातो. दररोज किमान चाळीस रुग्णांना तो दिला जातो.
मागील वर्षी कोरोना काळात या कुटुंबाने किरणा मालाचे एक किट बनवून खेडोपाडी गोरगरिबांना देऊन सामाजिक बांधिलकी जपली होती. एकनाथ बोऱ्हाडे हे आपल्या सेवानिवृत्ती वेतनातून तर मुलगा आपल्या वेतनातून तसेच भारतीय सैन्यात असलेला नातू यांच्या मदतीने हे काम चालते.
२४ कोतूळ