कोरोनाचा कहर, जिल्ह्यात ६११ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:20 AM2021-03-18T04:20:36+5:302021-03-18T04:20:36+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाचा कहर झाला. तब्बल ६११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ३२३ ...
अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाचा कहर झाला. तब्बल ६११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ३२३ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ६६७ इतकी झाली आहे. एका दिवसात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३३८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५२ आणि अँटीजेन चाचणीत २१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (१९६), अकोले (२५), जामखेड (१), कर्जत (१५), कोपरगाव (७३), नगर ग्रामीण (३०), नेवासा (४), पारनेर (२०), पाथर्डी (२४), राहाता (११३), राहुरी (७), संगमनेर (७५), शेवगाव (२), श्रीगोंदा (२१), श्रीरामपूर (१३), कॅन्टोन्मेंट (१६) आणि इतर जिल्हा (६) अशा रुग्णांचा समावेश आहे.
---
जिल्ह्याची स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : ७७,९२५
उपचार सुरू असलेले रूग्ण : २,६६७
मृत्यू : १,१८२
एकूण रूग्ण संख्या : ८२,०७४