कोरोनामुळे मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:25 AM2021-09-15T04:25:37+5:302021-09-15T04:25:37+5:30
कोपरगाव : कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून, शालेय पातळीवर त्यांचे समुपदेशन होणे आवश्यक ...
कोपरगाव : कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून, शालेय पातळीवर त्यांचे समुपदेशन होणे आवश्यक आहे. त्या प्रयत्नातून या लहान मुलांचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर परत आणता येईल, तसेच लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील राहून संसर्ग बाधितांवर शास्त्रीय उपचार करून कोरोनाला हरवू, असे आवाहन बालरोगतज्ज्ञ उज्ज्वला शिरसाठ-ढाकणे यांनी केले.
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात मंगळवारी (दि.१४) राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने लहान मुलांमध्ये होणारा कोरोना संसर्ग व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय याविषयी शालेय पातळीवर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चलचित्रफितीचा वापर करून, विद्यार्थ्यांना त्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. प्रारंभी राष्ट्रीय हिंदी दिवस निमित्ताने मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.उज्ज्वला शिरसाठ-ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.डी. गोरे यांनी तर पर्यवेक्षक आर.बी. गायकवाड यांनी आभार मानले.
यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे, संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, डॉ.अमोल अजमेरे यांनी हिंदी दिवसाच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या ऑनलाइन चर्चासत्राला डी.व्ही. तुपसौंदर, ई.एल. जाधव, ए.के. काले, ए.बी. अमृतकर, एन.के. बडजाते, एस.एन. शिरसाळे, ए.जे. कोताडे उपस्थित होते.
..................
फोटोओळी-
कोपरगाव शहरातील एस.जी. विद्यालयात हिंदी दिन साजरा करण्यात आला.
...........
फोटो१४ - हिंदी दिन - कोपरगाव
140921\1520-img-20210914-wa0029.jpg
फोटो१४ - हिंदी दिन - कोपरगाव