कोरोनाचा बळी ठरलेल्या मयताची कोरोनाबाधित रुग्णांनी पेटविली चिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 09:57 AM2020-08-23T09:57:29+5:302020-08-23T09:58:10+5:30
श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात देवदैठण येथील एका राजकिय नेत्यांच्या वडिलांचे गुरुवारी निधन झाले. या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने हात झटकले. त्यामुळे त्यांचा कोरोनाबाधित मुलगा व दुसरा कोरोनाबाधित रुग्ण यांनी शुक्रवारी मध्यरात्री या रुग्णाची चिता पेटविली. त्यामुळे कोरोनामुळे मयत झालेल्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात देवदैठण येथील एका राजकिय नेत्यांच्या वडिलांचे गुरुवारी निधन झाले. या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने हात झटकले. त्यामुळे त्यांचा कोरोनाबाधित मुलगा व दुसरा कोरोनाबाधित रुग्ण यांनी शुक्रवारी मध्यरात्री या रुग्णाची चिता पेटविली. त्यामुळे कोरोनामुळे मयत झालेल्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.
मयताचा मुलगा म्हणाला, मी कोरोनाबाधीत. माझ्यावर उपचार चालू असताना वडिलांचे कोरोनाने निधन झाले. श्रीगोंद्यात आम्हाला वडिलांचा मृतदेह अमरधामपर्यंत नेण्यासाठी गाडी मिळेना. अमरधाम सरपण नव्हते. लाईट नव्हती. एका बाजूला वडील गेल्याचे दुख आणि दुसºया बाजूला अंत्यसंस्कार करताना झालेली अवहेलना यामुळे अमरधाममध्य ढसाढसा रडलो.
शुक्रवारी पहाटे ग्रामीण रुग्णालयात कोरोनामुळे काष्टी येथील एकाचा मृत्यू झाला. या रुग्णावर शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा फिरवली नव्हती. मयताच्या मुलाने संताप व्यक्त केला. अखेर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडीक यांनी खाजगी गाडीत मृतदेह नेऊन श्रीगोंदा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले.