कोरोना तपासणी रिपोर्ट तत्काळ मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:49+5:302021-04-13T04:19:49+5:30
ढूस यांनी म्हटले, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत जिल्ह्यातील तालुका स्तरावर सुरू असलेल्या कोविड-१९ रुग्ण तपासणीसाठी जे घशातील श्राव ...
ढूस यांनी म्हटले, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत जिल्ह्यातील तालुका स्तरावर सुरू असलेल्या कोविड-१९ रुग्ण तपासणीसाठी जे घशातील श्राव अहमदनगर येथे पाठविले जातात, त्याचे रिपोर्ट संबंधित रुग्णास पाच दिवसांपर्यंत मिळत नाही. रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह याची पाच दिवस माहिती मिळेपर्यंत संभावित रुग्ण स्वतःच्या कुटुंबात, तसेच बाहेर मुक्तपणे फिरत असल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असावी.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावरील श्राव नमुन्याचा रिपोर्ट तत्काळ मिळण्याची व्यवस्था तत्काळ करावी. सदर रुग्ण लगेच रुग्णालयात भरती झाल्यास कोरोना रुग्णवाढीचा पुढील संभाव्य धोका टळेल. तसेच रुग्णावरही वेळेत उपचार होतील, असे ढूस यांनी निवेदनात म्हटले आहे.