माऊलींच्या नेवाशात मागितले जातेय "कोरोना मुक्तीचे पसायदान"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:52 PM2020-09-12T12:52:05+5:302020-09-12T12:53:07+5:30

नेवासा : जगाच्या कल्याणाचे पसायदान मागणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नेवासामध्ये कोरोना मुक्तीचे पसायदान मागितले जात आहे.जगभर देशात-राज्यात आणि अगदी प्रत्येक गावात ही कोरोना विषाणू महामारीचे थैमान घातलेले असतांना केंद्र व राज्य शासन,प्रशासन,पोलीस,डॉक्टर,पत्रकार,अंगणवाडी सेविका,नर्स,स्वच्छतेचे शुरवीर,सामाजिक संघटना आपापल्या परीने या लढ्यात योगदान देत आहेत.जगावर-देशावर आलेले हे कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे यासाठी मंदिर, मस्जिद,चर्च,गुरुव्दारा यामधून प्रार्थना केली जात आहे.

"Corona liberation pasayadan" is demanded in Mauli's Nevasa | माऊलींच्या नेवाशात मागितले जातेय "कोरोना मुक्तीचे पसायदान"

माऊलींच्या नेवाशात मागितले जातेय "कोरोना मुक्तीचे पसायदान"

नेवासा : जगाच्या कल्याणाचे पसायदान मागणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नेवासामध्ये कोरोना मुक्तीचे पसायदान मागितले जात आहे.जगभर देशात-राज्यात आणि अगदी प्रत्येक गावात ही कोरोना विषाणू महामारीचे थैमान घातलेले असतांना केंद्र व राज्य शासन,प्रशासन,पोलीस,डॉक्टर,पत्रकार,अंगणवाडी सेविका,नर्स,स्वच्छतेचे शुरवीर,सामाजिक संघटना आपापल्या परीने या लढ्यात योगदान देत आहेत.जगावर-देशावर आलेले हे कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे यासाठी मंदिर, मस्जिद,चर्च,गुरुव्दारा यामधून प्रार्थना केली जात आहे.

त्यात नेवासा तालुका ही मागे नाही.श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला असा हा नेवासा.

ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरूपात वसलेल्या ज्या रूपाचे वर्णन करता करता, शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच विश्वात्मक  देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरीरूपी वाग् यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान मागितलेले आहे.

     त्याच नेवासातील नारायण महाराज ससे यांनी माऊलींच्या पसायदानावर आधारित कोरोना मुक्तीचे पसायदान मागितलेले आहे.सध्या हे कोरोना मुक्ती पसायदान तालुक्यातील अनेक मंदिरांबाहेर हे कोरोना पसायदान फलक दिसून येत आहे.हे पसायदान लिहिण्यामागे लोकांची जनजागृती करण्याचा हेतू मात्र माऊली प्रमाणेच उदात्त आहे.

    कोरोना पासून मुक्ती हवी असेल तर प्रत्येक नागरिकाने काय केले पाहिजे,आपली जबाबदारी काय याबद्दल सविस्तर प्रबोधन करण्यात आलेले आहे.समाजाचे प्रबोधन करणे हाच तर ग्रंथ,कीर्तने,प्रवचने या सर्वांचा हेतू आहे.

 

 

कोरोना मुक्तीसाठी लिहिलेले पसायदान असे...

 

कोरोना पसायदान

 

आता सर्वात्मके जीवे l विनाकारण न फिरावे ll

घरीच बैसूनी रहावे l निवांतपणे ll1ll

 

एकमेका कर न मिळवावे l दुरुनीच नमस्कारावे ll

अंतर सुरक्षित राखावे l परस्परामाजी ll2ll

 

सर्वसर्वदा हात धुवावे l रूमालविना न शिंकावे ll

कोमट जल प्राशावे l थंड वर्जावे सर्वथा ll3ll

 

घरी येता जरी कंटाळा l मदत करावी गृहिणीला ll

पुण्य लगे जीवाला l पतीव्रतेचे ll4ll

 

करा स्वच्छता सदनाची l त्याच बरोबर तनाची ll

काढा जळमटे मानाची l शुचिर्भूत व्हावया ll5ll

 

करा मनन आणि चिंतन l थोडा वेळ नामस्मरण ll

चुकविता येईल मरण l स्वतःसहित इतरांचे ll6ll

 

आज पावे तो खूप पळाला l आता विश्रांती शरीराला ll

सादर व्हावे समयाला l संत वचन हे असे ll7ll

 

आहे विषाणूचे संकट l करा मनाला बळकट ll

ध्यान योगाचा वज्रटत l उभारावा भोवताली ll8ll

 

समय नव्हता म्हणोन l केले नसेल वाचन ll

ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन l आता तरी वाचावा ll9ll

 

आयुष्याला पुरेल l पुरोनिया उरेल ll

ग्रंथाची ऐसी रेलचेल l आहे संत कृपे ll10ll

 

अवाहन करिती वारंवार l दिल्ली आणि मुंबईकर ll

धोका वाढेल फार l बेफिकीर रहाता ll11ll

 

शासन,पोलीस,डॉक्टर l स्वच्छतेचे हे शुरवीर ll

सेवा देतो अहोरात्र l स्मरण त्याचे असावे ll12ll

 

हे ही जातील दुःखदिन l येतील पुढे सुखाचे क्षण ll

तोवर संयमाचे पालन l मनापासोन करावे ll13ll

 

येथे म्हने श्री निसर्ग रावो l कोरोना ना पसरावो ll

हाच हेतु मनी ध्यावो l जन कल्याण हेतुने ll14ll

               *-इती नारायनम*

 

 

या कोरोना पसायदानातून सर्व जीवांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये,घरातच निवांत बसून रहावे.एकमेकांशी हात न मिळवता दुरूनच नमस्कार करावा.सुरक्षित अंतर ठेवावे.थंड ऐवजी कोमट पाणी प्यावे.घरात बसून कंटाळा आला तर गृहिणीला मदत करावी,घराची,मनाची व तनाचीही साफसफाई करावी.आज पर्यंत खूप धावाधाव केली आता शरीराला थोडी विश्रांती दे.कोरोना विषाणूचे संकटात मनाला बळकट करा,स्वतः भोवती ध्यान-धारणा,योगाचा वज्रटत उभा करावा. वेळ मिळाला नाही म्हणून आज पर्यंत वाचला नसेल तर ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचवा.दिल्ली व राज्य शासन वारंवार अवाहन करत आहे,त्यांना सहकार्य करा,बेफिकीर वागू नका नाही तर धोका वाढेल.शासन,पोलीस, डॉक्टर,स्वच्छतेचे शूरवीर अहोरात्र सेवा देत आहेत त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवावे.दुःखाचे दिवस जाऊन पुन्हा सुखाचे दिवस येतील तोवर संयम ठरवावा असे अवाहन या पसायदानातून करण्यात आले आहे.

 

 

---------चौकट--------

 

ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख ( विश्वस्त संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान.नेवासा)

या विश्वातील संपूर्ण प्राणिमात्र व जीव सुखी राहावे यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाकरिता पसायदान मागितले.तसेच या कोरोना पसायदानाच्या माध्यमातून सुरक्षित कसे राहावे हा समाज्याला संदेश दिला आहे.माऊलींनी ज्या ठिकाणाहून पसायदानाची निर्मिती केली त्याच भूमीतून कोरोना पसायदानाच्या निमित्ताने विश्वाला पुन्हा संदेश दिला आहे.

 

--ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख ( विश्वस्त संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान.नेवासा)

 

---------------चौकट---------------------

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग,प्रशासन विविध उपाययोजना करत समाज्यात जनजागृती करत असतांना आम्ही संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदान संदर्भ घेत शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आव्हान या पसायदानातून करण्यात आले आहे.

 

-- नारायण महाराज ससे

(लेखक-कोरोना पसायदान ) 

Attachments area

ReplyForward

  

Web Title: "Corona liberation pasayadan" is demanded in Mauli's Nevasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.