कोरोना अजून गेलेला नाही; काळजी घ्या-शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:34 PM2021-01-24T16:34:51+5:302021-01-24T16:35:48+5:30
कोरोनाचे रुग्ण नगर जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत जास्त आहे. मात्र लोक निष्काळजी वागत आहेत. कोरोना अजून संपलेला नाही. यामुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येईल हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
अहमदनगर : कोरोनाचे रुग्ण नगर जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत जास्त आहे. मात्र लोक निष्काळजी वागत आहेत. कोरोना अजून संपलेला नाही. यामुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येईल हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
नगर येथील गुलमोहर रोड भागातील एका हॉस्पिटलच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर पवार बोलत होते. ते म्हणाले, कोरोनासारके मोठे संकट जगावर येऊन गेले. या कालावधीत लोकांना आधार हवा होता. त्यामुळे राज्यात दौरा केला. वैद्यकीय क्षेत्रातील तज्नाना एकत्र केले आणि कोरोनाविरोधातील लढाईत प्रेरणा दिली. अजुनही कोरोनाची स्थिती सुधारली नाही. प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे.
आजही कोरोनाचे नियम आहेत. मात्र ते पाळले जात नाही, हे येथील गर्दीवरून दिसतेय, असेही पवार म्हणाले.