नऊ लाख लोकांना होऊन गेला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:19 AM2021-02-12T04:19:54+5:302021-02-12T04:19:54+5:30

अहमदनगर : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषेदेने (आयसीएमआर) आतापर्यंत तीन वेळा सर्वेक्षण केले आहे. तिसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ४३३ लोकांचे ...

Corona passed nine million people | नऊ लाख लोकांना होऊन गेला कोरोना

नऊ लाख लोकांना होऊन गेला कोरोना

अहमदनगर : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषेदेने (आयसीएमआर) आतापर्यंत तीन वेळा सर्वेक्षण केले आहे. तिसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ४३३ लोकांचे रक्तनुमने तपासले. त्यामध्ये ९८ जणांमध्ये कोरोनाच्या ॲन्टीबॉडीज तयार होत असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजे हे प्रमाण २२.०६ टक्के इतके आहे. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणाशी तुलना केली असता तब्बल नऊ लाख लोकांना कोरोना होऊन गेला हे समजलेच नाही, असे स्पष्ट होत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘आयसीएमआर’च्या वतीने सीरो सर्वेक्षण करण्यासाठी राज्यातील बीड, परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगाव हे सहा जिल्हे निवडले होते. २१ ते ३० मे दरम्यान पहिला टप्पा, २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर रोजी दुसरा टप्पा, २३ ते २९ डिसेंबरदरम्यान तिसरा टप्पा झाला. या सर्वेक्षणात नागरिकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टीबॉडीज तयार होत आहेत का, याचे संशोधन करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात ४३३ लोकांचे रक्तनमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे प्रमाण २२.०६ टक्के आहे. या प्रमाणाशी एकूण लोकसंख्येशी तुलना केली असता तब्बल ९ लाख ९२ हजार ७०० लोकांमध्ये या ॲन्टीबॉडीज तयार होत असल्याचे दिसते आहे. म्हणजे एवढ्या लोकांना कोरोना होऊन गेला, हे समजलेच नाही, असेच या अहवालाचा अर्थ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही सेरो सर्वे करण्यात आला. नगर जिल्ह्यात १०३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे प्रमाण २०.०४ टक्के आहे. कोरोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

--------

सेरो सर्वे अहवाल

कोणाची चाचणी पॉझिटिव्ह प्रमाण

सामान्य नागरिक ४३३ ९८ २२.०६

हेल्थ केअर १०३ २१ २०.०४

-----------------

सेरो सर्वेक्षण कशासाठी ?

उच्च जोखीम असलेले आरोग्य सेवा कर्मचारी, कामगार, इम्युनो कॉप्रोप्राईज्ड व्यक्ती, कटेन्मेंट झोनमधील व्यक्ती संक्रमित झाल्या होत्या काय? हे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. तसेच रँडम पद्धतीने नागरिकांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करून त्यांच्यामध्ये ॲन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत काय? सामूहिक प्रतिकारशक्तीची माहिती होऊन उपाययोजनांची दिशा ठरविण्यासाठी प्रतिकार शक्तीचे अनुमान बांधले जाते व संसर्ग प्रमाणाचा अंदाज कळतो.

---

नगर जिल्ह्यात तीन टप्प्यांत सेरो सर्वे झाला. लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते की नाही, हे तपासण्यासाठी हा सर्वे होता. जिल्ह्यात २२ टक्के लोकांमध्ये इम्युनिटी वाढली आहे. याचाच दुसरा अर्थ त्यांना कोरोना होऊन गेला, असेही म्हणता येईल. हा सर्वे रँडम असतो. त्यामुळे त्याचा नक्की काय निष्कर्ष असेल, हे सांगणे कठीण आहे.

- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक

---

जिल्ह्यात कुठे झाला होता सर्वे

केळूंगण, कासार दुमाला, नांदुर्खी खुर्द, मडकी, शेवगाव, कौडगाव, वासुंदे, मधेवडगाव, संगमनेर, अहमदनगर, राशिन, बारडगाव सुद्रिक, मिरजगाव, कुलधरण.

---------

फाईल फोटो- कोरोना

Web Title: Corona passed nine million people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.