कोरोनाचे रुग्ण तालुक्यात घटले, बेलवंडीत वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:18+5:302021-06-30T04:14:18+5:30
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली त्यावेळी तालुक्यातील अगदी खेड्यापाड्यांत झपाट्याने रुग्णसंख्या वाढली होती. बेलवंडीत मात्र जास्त संसर्ग झाला नव्हता. ...
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली त्यावेळी तालुक्यातील अगदी खेड्यापाड्यांत झपाट्याने रुग्णसंख्या वाढली होती. बेलवंडीत मात्र जास्त संसर्ग झाला नव्हता. गेल्या पंधरा दिवसांत मात्र बेलवंडी व ढोरजे येथे रुग्णसंख्या वाढू लागल्याने नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. बेलवंडी येथे नागरिक सर्रास नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येत आहे. बेलवंडी येथे २५ जून ते १ जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. त्यानुसार या आठवड्याच्या कालावधीत मेडिकल व दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत.
--------------------
बेलवंडी येथे कोरोना तपासणीचा वेग वाढविण्यात आला आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता आठवडाभर मेडिकल व दवाखाने वगळून कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तालुक्यातील इतर गावे कोरोनामुक्त होऊ लागली असताना बेलवंडी येथे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. नागरिकांनी बाहेरगावी न जाता गावातील गर्दी कमी करून प्रशासन व कोरोना ग्रामसुरक्षा समितीला सहकार्य करावे.
-- सुप्रिया संग्राम पवार, सरपंच बेलवंडी बुद्रुक