पुनतगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला; २३ जण स्त्राव तपासणीसाठी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 12:13 PM2020-07-12T12:13:55+5:302020-07-12T12:14:59+5:30
नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे शनिवारी (११ जुलै) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. यामुळे संपूर्ण गाव चौदा दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबातील सदस्यांसह अन्य २३ जणांना कोरोना स्राव चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे शनिवारी (११ जुलै) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. यामुळे संपूर्ण गाव चौदा दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबातील सदस्यांसह अन्य २३ जणांना कोरोना स्राव चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पुनतगाव येथील एका व्यक्तीचा स्राव अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे खुद्द रुग्णाने नेवासा येथील कोविड सेंटर आणि जिल्हा रुग्णालयात चुकीचे नाव दिल्याने अहवालावरील नावावरून आरोग्य यंत्रणेत सावळागोंधळ समोर आला. परंतु रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत रुग्णाच्या नावाची खातरजमा झाल्यानंतर शेवटी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे शिक्कामोर्तब झाले.
सदर रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबातील सदस्यांसह अन्य २३ जणांना कोरोना स्राव चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. यामध्ये पाचेगाव येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे.
शनिवारी रात्री नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी पुनतगाव येथे भेट देऊन आढावा घेतला. यावेळी सुराणा यांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.