राणेगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला; १० जणांना तपासणीसाठी नगरला पाठिवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 03:27 PM2020-06-02T15:27:40+5:302020-06-02T15:28:22+5:30
शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याच्या संपर्कातील दहा जणांना तपासणीसाठी नगरला हलविले आहे, अशी माहिती शेवगावचे नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली.
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याच्या संपर्कातील दहा जणांना तपासणीसाठी नगरला हलविले आहे, अशी माहिती शेवगावचे नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली.
सदर तरुण कल्याण येथे फायर ब्रिगेडमधील सेवारत आहे. तो कल्याणहून रविवारी (दि.३१मे) सायंकाळी पाचच्या सुमारास विनापरवानगी गावी आला होता. रात्रभर तो गावी राहिला. मात्र खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने तो स्वत: हून मित्राला घेऊन दुचाकीवरून जिल्हा रूग्णालयात सोमवारी सकाळी दाखल झाला. तपासणी अंती सोमवारी (दि. १ जून) रात्री उशीरा त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी सांगितले.
दरम्यान या तरूणाच्या संपर्कात आलेल्या तब्बल दहा जणांना मंगळवारी दोन स्वतंत्र १०८ रूग्णवाहिकेतून तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले आहे. तर उर्वरित प्रथम संपर्क झालेले १६ व द्वितीय संपर्कातील २६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे, असे बेरड यांनी सांगितले.