वांबोरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:33 PM2020-05-24T12:33:46+5:302020-05-24T12:34:11+5:30
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. परवा रात्री दहा वाजता या रुग्णाला ताप आल्याने अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
राहुरी : तालुक्यातील वांबोरी येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. परवा रात्री दहा वाजता या रुग्णाला ताप आल्याने अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
चेंबूर येथून परवा रात्री एक ३६ वर्षे वयाचा व्यक्ती वांबोरी येथे आला होता. त्याचे वांबोरी मूळ गाव आहे. त्याला दोन दिवसांनी ताप आल्यानंतर अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. त्याला कोरोना झाल्याचे रविवारी अहवालातून स्पष्ट झाले आहे, असे विखे यांनी सांगितले.
चेंबूर येथे एका कारखान्यांमध्ये सदरची व्यक्ती नोकरीला आहे. त्याच्यासोबत आणखीन एक व्यक्ती असल्याचे प्रशासनाच्या उघडकीस आले आहे. संबंधित व्यक्तीला परवा ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. तहसीलदार एफ.आर. शेख वांबोरी येथे दाखल झाले आहेत. त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आणखी कोण कोण व्यक्ती आल्या आहेत, याची चौकशी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
....