कोरोनाचा दिलासा : नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.९६ टक्के; ४१ हजार ४३३ रुग्ण बरे होऊन परतले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 01:34 PM2020-10-04T13:34:50+5:302020-10-04T13:35:05+5:30
अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (४ आॅक्टोबर) ३५८ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.९६ टक्के इतके झाले आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी (४ आॅक्टोबर) ३५८ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.९६ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणा-या रुग्णांची संख्या आता ३ हजार ३८५ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले १३, नगर ग्रामीण २, नेवासा २, पाथर्डी ५, शेवगाव ७, श्रीगोंदा ३, श्रीरामपूर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, रविवारी ३५८ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ५०, अकोले ३०, जामखेड १७, कर्जत २८, कोपरगाव २०, नगर ग्रामीण २३, नेवासा १५, पारनेर ०८, पाथर्डी ३४, राहाता ३८, राहुरी ७, संगमनेर ३८, शेवगाव २४, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर २, कँटोन्मेंट ४ अशा रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती नगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.