नगर शहरात कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 02:16 PM2020-07-16T14:16:23+5:302020-07-16T14:16:50+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता. या आदेशाची आता ३१ जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता. या आदेशाची आता ३१ जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता. मात्र हा आदेश अहमदनगर महापालिका क्षेत्रात १७ जुलैपर्यंत लागू करण्यात आलेला होता. या आदेशाची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. नगर शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. याबाबत सध्याच्या आदेशाप्रमाणेच ३१ जुलैपर्यंत अंमलबजावणी कायम राहील.
या आदेशानुसार सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. तसेच सकाळी ९ ते सायंकाळी पाच या वेळेत परवानगी असलेली सर्व दुकाने, आस्थापना नियमांचे पालन करून सुरू राहणार आहेत.
याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज जारी केला आहे.