हॉस्पिटलमधून पसार झालेल्या उत्पादन शुल्कच्या अधिकाºयाविरोधात गुन्हा,कोरोना संशयित, पोलिसांकडून शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 12:39 PM2020-04-14T12:39:15+5:302020-04-14T13:51:43+5:30
अहमदनगर : कोरोना तपासणीसाठी श्राव नमुने घेतल्यानंतर हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन न होता डॉक्टरांना दमदाटी व शिवीगाळ करून पसार झालेल्या उत्पादन शुल्कच्या एका अधिकाºयाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी डॉ. श्रीकांत चंद्रकांत पाठक यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाºयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते अधिकारी हे पुणे येथे जाऊन आल्याने ते १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. यावेळी डॉ. पाठक यांनी त्यांचे स्राव नमुने घेतले व त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगितले. यावेळी त्यांनी पाठक व हॉस्पिटलमधील इतर कर्मचाºयांना शिवीगाळ व दमदाटी करून तेथून ते बेजबाबदारपणे निघून गेले. त्या अधिकाºयाने सार्वजनिक आरोग्याला धोका होईल असे कृत्य केले असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरसे हे करत आहेत.