आठ दिवसांत १ हजार ६०० विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:08+5:302021-05-28T04:17:08+5:30
शहरातील नवी पेठ, बाजारपेठ, शनी मंदिर चौक, नगर -कोपरगाव महामार्ग, मल्हारवाडी रस्ता, प्रगती विद्यालय रस्ता, भागीरथीबाई तनपुरे विद्यालय रस्त्यावर ...
शहरातील नवी पेठ, बाजारपेठ, शनी मंदिर चौक, नगर -कोपरगाव महामार्ग, मल्हारवाडी रस्ता, प्रगती विद्यालय रस्ता, भागीरथीबाई तनपुरे विद्यालय रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात भाजीपाला व गृहउपयोगी वस्तू घेण्यासाठी मोठी वर्दळ होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार राहुरी तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पालिकेचे पथकाचे गेल्या आठ दिवसांपासून बाजार समिती, जुने ग्रामीण रुग्णालयासमोर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे.
पालिकेचे कर निरीक्षक महेंद्र ताकपिरे, सहकारी काकासाहेब शिरसाट, राजेंद्र खंगले, सुनील कुमावत, शीला राहिंज, ज्ञानेश्वरी तंटक, रवींद्र सरोदे, दीपक विधाटे, राजू शेख, लक्ष्मण भालेराव यांच्या पथकाने १ हजार ६०० नागरिकांच्या अँटिजन चाचण्या केल्या. त्यापैकी केवळ सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले.
( २७ राहुरी टेस्ट)