जिल्ह्यातील ६६१४ शिक्षकांची होणार कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:22 AM2021-01-19T04:22:56+5:302021-01-19T04:22:56+5:30
राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. टप्प्याटप्प्याने या शाळांची उपस्थिती वाढत आहे. राज्यात कोरोनाची ...
राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. टप्प्याटप्प्याने या शाळांची उपस्थिती वाढत आहे. राज्यात कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाने सोमवारी (दि. १८) आदेश काढला आहे. त्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातही तयारी सुरू झाली असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना तशा सूचना दिल्या आहेत. नगर जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत २००३ शाळा असून, त्यात ३ लाख ७ हजार ७७७ विद्यार्थी आहेत. या शाळांना ६ हजार ६१४ शिक्षक अध्यापन करत असून, आता त्यांच्या कोरोना चाचणी करण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
----------
जिल्ह्यातील पाचवी ते आठवी एकूण शाळा - २००३
विद्यार्थ्यांची संख्या - ३ लाख ७ हजार ७७७
शिक्षकांची संख्या - ६६१४
--------
विद्यार्थी संख्या
पाचवी - ७९६०५
सहावी - ४६९६८९
सातवी - ७९७७८
आठवी - ८००६८
----------------
कोरोना चाचणी करण्याची तयारी
२७ जानेवारीला शाळा सुरू होणार असल्याने जिल्ह्यातील पाचवी ते आठवी अशा एकूण ६ हजार ६१४ शिक्षकांची कोरोना चाचणी (आरटीपीसीआर) होणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी तशा सूचना शिक्षकांना दिल्या आहेत. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच शिक्षकांना शाळेत हजर राहता येणार आहे.
---------
शिक्षणाधिकारी कोट
पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याबाबतचा शासन आदेश सोमवारी दुपारी प्राप्त झाला. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील नियोजन केले आहे. प्रथम शिक्षकांची कोरोना चाचणी होणार आहे. शाळा निर्जंतुकीकरणाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
--------------