फिरत्या पथकाद्वारे कोरोना चाचणी; आठ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:19 AM2021-05-24T04:19:41+5:302021-05-24T04:19:41+5:30
‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कडक निर्बंध घालून दिले असतानादेखील नागरिकांकडून निर्बंधांचे उल्लंघन होत आहे. नागरिक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. ...
‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कडक निर्बंध घालून दिले असतानादेखील नागरिकांकडून निर्बंधांचे उल्लंघन होत आहे. नागरिक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे दंडात्मक कारवाईबरोबरच त्यांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात येते आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशान्वये संगमनेर शहर व परिसरातही फिरत्या पथकाद्वारे ही चाचणी करण्यात येते आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाणे, महसूल व संगमनेर नगर परिषद प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. विविध ठिकाणी एकूण ९३ लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी आठ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.