कोरोना उपचार केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:43+5:302021-04-22T04:20:43+5:30
श्रीरामपूर : साई खेमानंद फाउंडेशनच्या माध्यमातून उंबरगाव येथे कोरोना उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी बेलापूर व पंचक्रोशीतील ...
श्रीरामपूर : साई खेमानंद फाउंडेशनच्या माध्यमातून उंबरगाव येथे कोरोना उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी बेलापूर व पंचक्रोशीतील सरपंचांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे केली आहे.
बेलापूर, वळदगाव, उंबरगाव, पढेगाव, केसापूर, आंबी, दवणगाव, संक्रापूर, अंमळनेर, गंगापूर, एकलहरे, उक्कलगाव, कुरणपूर, गळनिंब, फत्याबाद ,मांडवे, कडीत येथील सरपंचांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना पत्र पाठविले आहे.
परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. नातेवाईक रुग्णांना घेऊन वणवण फिरत आहेत. त्यामुळे साई खेमांनद फाउंडेशन उपचार केंद्र सुरू केले तर नागरिकांना दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, वर्षा महाडिक, नितीन थोरात, रिजवाना शेख, किशोर बनकर, गीताराम खरात, राजेंद्र ओहोळ आदींच्या सह्या आहेत.
---------