अहमदनगर कॉलेजमध्ये कोरोना लसीकरण जागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:05+5:302021-05-20T04:22:05+5:30
गेल्या एक ते दीड वर्षापासून कोविडचे वातावरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे अवघड झाले. परिणामी सामाजिक माध्यम ...
गेल्या एक ते दीड वर्षापासून कोविडचे वातावरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे अवघड झाले. परिणामी सामाजिक माध्यम अंतर्गत सध्या कार्यक्रम घ्यावे लागत आहेत. या महामारीत मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. परिणामी ही परिस्थिती दूर करण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा दुवा आहे. हे जागतिक पातळीवर सिद्ध झाले आहे. तसेच या कालावधीत भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली. तोच धागा पकडून अहमदनगर महाविद्यालयाने लसीकरण जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः नवतरुणांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि अहमदनगर कॉलेज, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर या चार विद्यापीठामधील १७
महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला, तर ११७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस, पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतमकुमार बेदरकर, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ. भागवत परकाळ यांनी परिश्रम घेतले.