कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:23 AM2021-01-19T04:23:48+5:302021-01-19T04:23:48+5:30

अहमदनगर : कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे किंवा मनात किंतू बाळगण्याचे कारण नाही. कोणतीही लस ...

Corona vaccination is completely safe | कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित

कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित

अहमदनगर : कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे किंवा मनात किंतू बाळगण्याचे कारण नाही. कोणतीही लस अथवा इंजेक्शन घेतल्यानंतर किरकोळ प्रमाणात ताप, अंग दुखणे, मळमळ होणे आदी लक्षणे जाणवतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणाच्या वेळी जिल्ह्यात चार आरोग्य कर्मचाऱ्यांना जाणवलेली लक्षणे याचप्रकारची होती. त्यामुळे कोणताही गैरसमज या लसीकरणाविषयी नको, असे राज्य शासनाचे कोविड सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.१८) डॉ. म्हैसेकर यांनी कोरोनाविषयक बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, जिल्हा टास्क फोर्सचे सदस्य डॉ. एस. दीपक आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या घेणे तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींची लवकर चाचणी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करावी. जिल्ह्यात ज्या भागात सध्या बाधितांचे प्रमाण आढळून येत आहे, तेथे चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. त्याचबरोबर, ज्यांचा व्यवसाय अथवा फिरण्याच्या निमित्ताने इतरांशी दैनंदिन संपर्क होण्याची शक्यता जास्त आहे, अशा व्यक्तींच्याही चाचण्या घेतल्या जाव्यात, असे त्यांनी सांगितले. ज्या व्यक्तींचे ॲन्टिजेन चाचण्या निगेटिव्ह आलेल्या आहेत, अशा व्यक्तींना लक्षणे असतील तर त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जावी. राज्य शासनाने आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Corona vaccination is completely safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.