जवळे येथे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:58+5:302021-05-10T04:20:58+5:30
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्याचा प्रारंभ सरपंच अनिता सुभाष आढाव यांच्या ...
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्याचा प्रारंभ सरपंच अनिता सुभाष आढाव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आढाव म्हणाल्या, मागील वर्षापासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून त्याला रोखण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने घराच्या बाहेर पडताना मास्क वापरावा. डॉ. सुप्रिया कारखिले म्हणाल्या, अधिकाधिक लस मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांचे सहकार्य मिळायला हवे. येथे १२६ जणांना लस देण्यात आली. लसीकरण सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी नितीन शिंदे, संपत गाडे, अंगणवाडी सेविका संगीता विश्वासराव, आशा सेविका स्वाती इंगळे, रूपाली चौधरी, निर्मला खुपटे, संगीता रासकर, सलीमा शेख, भारती सोनावळे, संदीप फटांगडे, वसंत चौधरी, कल्पना पठारे यांचे सहकार्य लाभले.