कोरोना लसीकरणाची सरावफेरी यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:38+5:302021-01-09T04:17:38+5:30

शुक्रवारी संपूर्ण राज्यात कोरोना लसीकरणासाठी सरावफेरी घेण्यात आली. त्यासंदर्भात राज्य शासन आणि आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात महानगरपालिका ...

Corona vaccination practice successful | कोरोना लसीकरणाची सरावफेरी यशस्वी

कोरोना लसीकरणाची सरावफेरी यशस्वी

शुक्रवारी संपूर्ण राज्यात कोरोना लसीकरणासाठी सरावफेरी घेण्यात आली. त्यासंदर्भात राज्य शासन आणि आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात महानगरपालिका आणि ग्रामीण भागात या लसीकरण मोहिमेचे प्रात्यक्षिक झाले. सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी महानगरपालिकेच्या तोफखाना नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील लसीकरण सरावफेरीची पाहणी केली. ग्रामीण भागातील वाळकी (ता. नगर) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे तसेच जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी भेट दिली. तेथील लसीकरण मोहीम सरावफेरीसंदर्भात केलेली तयारी आणि प्रत्यक्ष सरावफेरी त्यांनी पाहिली.

तोफखाना नागरी आरोग्य केंद्र येथे महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना माहिती दिली. कार्यक्रम अधिकारी डॉ. नलिनी थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका गोरे, डॉ. सुजीत सैंदाणे, मंगला माटे, प्रतिमा राऊत, पूनम सूर्यवंशी, निर्मला गायकवाड, अलका कोलवते, अन्सारी ईबारतुनिसा, राहील प्रभुणे, इम्रान सय्यद, अमोल गुजर, सोनाली कर्पे, योगेश गडाख, विकास गीते, द्वारका साठे आदींनी या लसीकरण मोहिमेसंदर्भातील सरावफेरीदरम्यान विविध कामांचे संयोजन केले.

-------------

.... अशी पार पडली लसीकरणाची सरावफेरी!

या लसीकरण सरावफेरीसाठी प्रत्येक केंद्रावर २५ लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती. आरोग्य केंद्रात आल्यानंतर त्यांची ओळख पटवणे, त्यांच्या शरीराचे तापमान मोजणे आणि ऑक्सिजन प्रमाण तपासणे, त्यानंतर त्यांची नोंद केली जात होती. कोविन ॲपवर त्यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा झाल्यानंतर त्यांना लसीकरण दिले जात होते. लसीकरणानंतर किमान अर्धा तास त्यांना विश्रांती कक्षात थांबवून काही त्रास तर होत नाही,याची खात्री केली जात होती. संबंधितांना मोबाईलवर लसीकरणाचा पहिला डोस झाल्याचा संदेश प्राप्त होत होता. अशा प्रकारे लसीकरणाची ही सरावफेरी पार पडली.

-------

फोटो - ०८ड्रायरन १

ड्राय रन मोहिमेंतर्गत तोफखाना आरोग्य केंद्र येथे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना माहिती दिली.

Web Title: Corona vaccination practice successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.